
गावरान पद्धतीचे अंड्याचे कालवण
कधी कधी recipe एव्हढी सोप्पी असते की इतके दिवस ही मी साधारण महिन्यातून दोनदा तरी बनवते पण इथे लिहिण्यासाठी मला अजिबात महत्वाची वाटली नाही. आज जेव्हा मी ही बनवली तेव्हा सहज म्हणून post केली.
हे कालवण बनवायला खूप सोप्पे आहे. फक्त मालवणी मसाला आणि लाल तिखट वापरलं आहे. कधीतरी सागरसंगीत स्वैपाक बनवायचा कंटाळा आला की ही अंडा curry आणि ज्वारीची भाकरी असा साधा सोप्पा बेत करायचा. खूप चविष्ट अशी ही बैदा curry बनवायला जास्त वेळ लागत नाही. भातासोबतही हा अंडा मसाला मस्त लागतो. गरम मसाला, काजू किंवा बाकी काही उंची पदार्थ न घालताही याची चव अगदी भन्नाट लागते. तुम्ही एकदा जरूर करून बघा.
रात्रीच्या जेवणात जर खूप पदार्थ करायचा कंटाळा आला असेल तर इथे मी झटपट असे कुकरमध्ये होणारे वेगवेगळे भाताचे प्रकार दिले आहेत. तेही नक्की करून बघा.
मटार भात / ओल्या तुरीच्या दाण्यांचा भात
साहित्य:
४ अंडी उकडून, सोलून
२ मोठे कांदे सोलून, बारीक चिरून
२ आमसूल
चवीनुसार मीठ
१ छोटा चमचा मालवणी मसाला
१ छोटा चमचा बेडगी मिरची पूड
२ चमचे हिरवी कोथिंबीर बारीक चिरून
वाटणासाठी:
७-८ सोललेल्या लसून पाकळ्या
अर्धा इंच आलं
मुठभर हिरवी कोथिंबीर
अर्धी वाटी सुखं खोबरं
फोडणीसाठी:
२ मोठे चमचे तेल
१ छोटा चमचा जीरे
२ हिरव्या वेलची
४ लवंग
१ इंच दालचिनी
कृती:
एका कढईत तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की त्यात फोडणीसाठी दिलेलं साहित्य टाकायचं.
जिरं तडतडलं की त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा.
कांदा खरपूस, तांबूस रंगाचा झाल्यावर त्यात वरील दिलेलं वाटण घालायचं.
सगळं एकत्र करून ५ ते ७ मिनिट तेल सुटेपर्यंत परतायचं.
आता लाल तिखट, मालवणी मसाला आणि चवीपुरता मीठ घालायचं.
सगळं एकत्र करून १ मिनिट परतून, १ मोठं भांड पाणी टाकायचं.
२ आमसुलं टाकून झाकण ठेऊन उकळी येऊ द्यायची.
२-३ मिनिटांनी झाकण काढून, उकडलेली अंडी टाकायची.
अंडी घातल्यावर २ मिनिट हे कालवण उकळ की थोडी चिरलेली कोथिंबीर घालून gas बंद करायचा.
तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: २५ मिनटे
वाढणी: २-३ जणांसाठी






Leave a Reply