बटाटा घालून केलेली पालकाची ग्रेव्ही ही पालक बटाट्याची भाजी बनवायला खूप सोपी आहे. पालक-पनीर पेक्षा झटपट बनते आणि खाल्ल्यावर पोट जड होणे, gas होणे ह्या समस्याही उद्भवत नाहीत. ह्यात कांदा टोमाटो वाटून घ्यावे लागत नाहीत, की वरून क्रीम घालावे लागत नाही. बटाटा घातल्यावर तर कोणतीही भाजी चांगली लागते असे माझे मत आहे….
Recipes in Marathi
कैरीचे सरबत
उन्हाळ्याच्या दिवसात बरेचजण कैरीचे पन्हे बनवतात. मलाही पन्हे खूप आवडते. पन्हे बनवायचे म्हटले की कैऱ्या उकडा, सोला असा बराच घाट घालावा लागतो. एप्रिल, मे आला की आमच्या परसातले आंब्याचे झाड खूप फळांच्या ओझ्याने अगदी वाकून जाते. रोज ४-५ कैऱ्या नक्की पडतात. पडलेल्या कैऱ्या आंब्याची डाळ, टक्कू किव्वा चटणी करायला वापरता येतात. एक दिवस…
सोलकढी
कोकम कढी सोलकढीला काहीजण कोकमाची कढी किवां कोकमसार असेही म्हणतात. सोलकढी न आवडणारा कोकणी माणूस मिळणे विरळाच. सोलकढी मला कधी आवडायला लागली हे सांगणे कठीण आहे, पण पहिली आठवण सोलकढीविषयी खूप खूप जुनी आहे. एकदा आम्ही आमच्या आज्जीच्या नातेवाईकाकडे गेलो होतो. त्यांच्याकडे जेवायला मसालेभात आणि सोलकढीचा बेत होता. त्यांच्याकडून आल्यावर मला आठवतंय…
मोरी माश्याचे कालवण
मुशीचे कालवण ‘मोरी मासा’ नाव तसं विचित्रच आहे. काही मंडळी ह्याला ‘घोळ’, ‘मुशी’ असेही म्हणतात. नाव काहीही असले तरी मांसाहारी व्यक्तींना चवीशी घेणेदेणे असते, नावाशी नाही. मच्छी मार्केटमध्ये हल्ली मास्यांचे भाव ऐकले तर सर्वसाधारण माणसाला एक मोठे पापलेट विकत घेणेही आवाक्याच्या बाहेर झाले आहे. परवाचीच गंमत सांगते. ३ मोठ्या पापलेटच्या वाट्यावरून माझी एका कोळणीशी…
मसालेदार मालवणी चिकन करी
ही चिकन करी बघून तोंडाला पाणी सुटले की नाही? ही चमचमीत, झणझणीत चिकन करी बनवायला एकदम सोपी आणि झटपट तयार होणारी आहे. एकदा का कांदा-खोबर्याचे वाटण तयार करून घेतले की ही डिश १५-२० मिनटात खायला तयार झालीच म्हणून समजा. कांदा-खोबर्याचे वाटण करणे ही एकच वेळखाऊ गोष्ट ह्याच्यात त्रासदायक वाटू शकते. मी हे वाटण…
भाजलेला कांदा-खोबरं मसाला
आज आपण ह्या पांरपारिक कांदा खोबरं मसाल्याच्या कृतीची माहिती घेणार आहोत. कांदा आणि सुखे खोबरे ह्या मसाल्याचे प्रमुख घटक आहेत. हा मसाला बनवताना सगळे जिन्नस तेलात खरपूस भाजून वाटून घेतले जातात. भाजून केल्यामुळे हा मसाला फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस चांगला टिकतो. हा मसाला करताना फक्त अर्धा चमचा तेल वापरावे. सुखे खोबरे आणि…
फ्रुट सलाड
मे महिना चालूही झाला नाही, पण उकाडा मात्र प्रचंड जाणवायला लागलाय. आमच्या बागेत आंबे, पपई, चिक्कू आणि जाम लगडलेले आहेत. ही फळ जणु उन्हाळा चालू झाल्याची वर्दी देत आहेत. कालच शहाळीसुद्धा उतरवली आहेत. एकूण जेवण कमी आणि फळ, सरबत व नारळपाणी पिऊन पोट जास्त भरत आहे. खुपदा दुपारच्या जेवणाला चाट देऊन मी हे…
मावा केक
मावा केकचं नुसते नाव जरी काढले तरी तोंडाला पाणी सुटते. दोन-तीन वर्षापूर्वी जेव्हा मला मावा केक बनवायचा होता, तेव्हा मी नेटवर, पुस्तकात ह्याची पाककृती शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण मला खूप शोधूनही काहीच मिळालं नाही. त्यानंतर दोन ते तीन वेळा try करून शेवटी मी ह्या रेसेपी पर्यंत पोहोचले. ह्या केकमध्ये अंड किंवा बटर…
अळूचे फद्फदे
कोकणस्थ ब्राह्मणांच्या घरी कोणताही उत्सव असला की आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे अळूचे फद्फदे. जरा विचित्र नाव आहे पण चवीला मात्र पंजाबी पालक पनीरलाही लाजवेल अशी ही पातळ अळूची भाजी. गोडा मसाला, चिंच आणि गुळ ह्याचं अचाट कोम्बीनेशन. लहानपणी मला ही भाजी अजीबात आवडायची नाही. हिच्या नावाचाही तिटकारा होता. एक दिवस आईने ही…
ताक घालून केलेली पोळी
रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही ताकातली पोळी करून बघा. ताकातली पोळी म्हणजे, गव्हाच्या पीठात ताक आणि चिमटीभर खाण्याचा सोडा टाकून, पातळ पीठ भिजवून नंतर त्याच्या पोळ्या करायच्या. हॉटेलमध्ये जो कुल्चा हा प्रकार मिळतो, त्यापासून प्रेरणा घेऊन बनवलेला, पण कुल्चापेक्षा जास्त पौष्टिक असा हा पदार्थ आहे. घरी बनवत असल्याने…
Recent Comments