
आमच्याकडे ईदच्या दिवशी बाबांच्या मित्राकडून बिर्याणी, शीरकुर्मा आणि गुलगुले नेहमी यायचे. आम्ही सुद्धा वाट बघायचो. एव्हडी टेस्टी बिर्याणी खाल्ल्यावर पुढचे २ दिवसतरी त्याची चव जिभेवर रेंगाळत राहायची.
चिकनची ग्रेव्ही त्याच्यावर बासमती भाताचा थर, त्यावर सोनेरी तळलेला कांदा अशी जर थर लावून बिर्याणी बनवायची असेल तर त्याला खूप वेळ आणि मेहनत लागते. खूप वेळखाऊ काम आहे हे. मी साधारण हे काम शनिवार-रविवार किंवा सुट्टीच्या दिवशीच करते. तळलेले कांदे मी online मागवते. यामुळे खूप वेळ वाचतो आणि तेलही. भात सुद्धा आदल्या दिवशी शिजवून ठेवते आणि चिकन मँरीनेट करून ठेवते. अत्यंत घाईत किंवा अति आळशीपणा करणाऱ्यांसाठी अशा रीतीने वेळ वाचवून मस्त tasty अशी बिर्याणी पटकन तयार होते.
वेगवेगळ्या chicken recipe करून बघायच्या असतील तर खाली लिंकवर click करा.
तळलेले कांदे एकदा order केले की वर्षभर चांगले टिकतात. मी तर एक किलोभर घेऊन ठेवते. खूप घाईच्या वेळी मच्छीचं कालवण किंवा chicken curry बनवायची असेल तर मुठभर हे तळलेले कांदे, ओलं खोबरं आणि भाजलेले सुखं खोबरं असं वाटून मसाला तयार करायचा आणि पटकन पदार्थ बनवायचा. हा वाटलेला मसाला उसळ बनवण्यासाठीही कामाला येतो. खाली ज्या लिंक दिल्या आहेत तिथून तुम्हीही हे तळलेले कांदे order करू शकता.
मला वाटतंय की खूप किचकट अशी recipe वाचण्यापेक्षा मी खाली video दिला आहे, त्यात बघून तुम्हांला प्रत्येक टप्प्यावर लागण्यार्या गोष्टी आणि त्याची योग्य कृती ही लगेचच लक्षात येईल.
साहित्य:
२५० ग्राम बासमती तांदूळ
५०० ग्राम चिकन स्वच्छ करून, धुवून
१ मोठा कांदा बारीक चिरून
अर्धी वाटी तळलेला कांदा
एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट
१ छोटा चमचा लाल तिखट
२ मोठे चमचे बिर्याणी मसाला
१ छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
३ मोठे चमचे तेल
२ छोटे चमचे तूप
अख्खा गरम मसाला:
अर्धा छोटा चमचा जीरे
४ लवंग
५-६ काळी मिरी दाणे
४ हिरवी वेलची
१ चक्री फुल
१ इंच दालचिनीचा तुकडा
मुरवण्यासाठी:
पाऊण वाटी घट्ट दही
एक छोटा चमचा chicken मसाला
एक छोटा चमचा लाल तिखट
अर्धा छोटा चमचा हळद
पाव छोटा चमचा गरम मसाला
चवीनुसार मीठ
थर लावण्यासाठी:
अर्धी वाटी तळलेला कांदा
अर्धी वाटी बारीक चिरलेली पुदिना आणि कोथिंबीर
३ मोठे चमचे केशर पाणी
बिर्याणी आणि केवडा essence
चवीनुसार मीठ

कृती:
वरील मुरवण्यासाठी दिलेलं साहित्य आणि चिकन हाताने नीट कालवून मुरण्यासाठी कमीतकमी एक तास तरी बाजूला ठेवायचं.
तांदूळ २ ते ३ पाण्यातून स्वच्छ धुवून किमान अर्धा तास तरी पाण्यात भिजवून ठेवायचे.
जाड बुडाच्या पसरट पातेल्यात, मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवायचं.
दुसऱ्या gas वर भात शिजायला ठेवायचा.
तेल गरम झाल्यावर त्यात अख्खा गरम मसाला घालायचा.
जीरे तडतडले की त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा.
कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत ७ ते ८ मिनिटे परतून घ्यायचा.
आता त्यात आलं-लसूण पेस्ट घालायची, २-३ मिनटे परतून घ्यायची.
ह्यात मुरवलेले chicken घालायचं. कांदा-लसूण सह एकत्र परतून झाकण लावून शिजू द्यायचं.
शिजलेला भात गाळणीवर उपसून टाकायचा. भात बोटचेपा होईपर्यंत ९०% शिजवायचा.
७ ते ८ मिनिटांनी झाकण काढल्यावर परत एकदा ढवलायचं. मसाला खाली लागला नाही आणि चिकन पूर्णपणे शिजलंय याची खात्री झाल्यावर लाल तिखट, बिर्याणी मसाला, तळलेला कांदा, चवीनुसार मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची.
आता हे सगळं एकत्र करून, तळाला एका थरात पसरून घ्यायचं. आता त्यावर शिजलेल्या भाताचा एक थर द्यायचा.
त्यावर केवडा आणि बिर्याणी essence चे काही थेंब टाकायचे. एक छोटा चमचा बिर्याणी मसाला, पुदिना कोथिंबीर आणि तळलेला कांदा पसरून घ्यायचा.
केशर पाणीही सगळीकडे चमच्याच्या साह्याने शिंपडून घ्यायचं.
आता त्यावर उरलेला बासमती भात पसरून घ्यायचा. थोडंस मीठ भुरभुरून घ्यायचं.
तळलेला कांदा पसरवायचा. दोन चमचे तूप घालून घ्यायचं.
आता झाकण ठेऊन, मंद gas वर ही बिर्याणी वाफवायला ठेवायची.
gas बंद करून कमीतकमी १५ मिनिटांनसाठी झाकून ठेवायची.
मग गरमागरम बुंदी रायत्यासोबत खायला घ्यायची.
मुरवण्यासाठीचा वेळ: १ तास
तयारीसाठी लागणारा वेळ: ३० मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: २५ मिनटे
वाढणी: ३-४ जणांसाठी






Leave a Reply