
असा मस्त तळलेला माश्याचा तुकडा, वाफाळलेला भात आणि सोलकढी, सुखं म्हणजे अजून काय पाहिजे! माझी थोडीशी जास्त अपेक्षा म्हणजे, आयते ताटात हे पदार्थ मिळाले तर स्वर्गसुख.
आता lockdown मुळे बाजारात जाऊन मच्छी खरेदी करण बंद आहे. online घरपोच मच्छी पुरवठा करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना माझे मनापासून धन्यवाद. ह्या घरपोच सेवा देणाऱ्या सगळ्या काका-दादांना माझे मनापासून धन्यवाद. I am very grateful. They are risking their life so that we can remain safe inside at home. Please stay home,stay safe.
तर अशा कंपनीकडून मी ही मच्छी मागवली. छान मोठे मोठे रावसचे तुकडे अगदी फ्रेश deliver केले. लगेचच मी एक तुकडा marinate करून दुपारी fry केला. हा एव्हढा मोठा होता की आम्हांला दोघांना पुरेसा झाला.
या आधी मी छोटा रावस मासा अख्खा आणत होते आणि घरीच साफ करून त्याचे छोटे तुकडे करून fry करत होते. तुम्हांला त्याची कृती बघायची असेल तर खाली ही लिंक दिली आहे.
‘Indian Salmon Fish Fry Recipe’
अजूनही काही मस्त माश्यांच्या recipe मी इथे दिल्या आहेत. तुम्ही जर माझ्यासारखे मासेखाऊ असाल तर तुम्हांला ह्या recipe नक्की आवडतील.
हिरव्या वाटणातील बोम्बीलाचे कालवण
आता पटकन मी ही रावस माश्याची कृती सांगते. ह्यासाठी मी काही वाटण वैगरे न करता नेहमीचेच मसाले आणि कोकम आगळ वापरलय. कोकम आगळ नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरला तरी चालेल.
साहित्य:
अंदाजे २००gm रावस माश्याचा मोठा तुकडा
२ मोठे चमचे कोकम आगळ
२ मोठे चमचे तेल
२ मोठे चमचे तांदूळ पीठ
सुखे मसाले:
२ छोटे चमचे काश्मिरी लाल तिखट
१ छोटा चमचा मालवणी मसाला
पाव छोटा चमचा चाट मसाला
पाव छोटा चमचा हळद
चवीनुसार मीठ
कृती:
वरील सर्व मसाल्यांचे साहित्य एकत्र करून, कोकम आगळ घालून पेस्ट करून घ्यायची.
ही पेस्ट माशाच्या तुकड्याला दोन्ही बाजूला चोळून घ्यायची.
आता हा मासा अर्धा-एक तासासाठी बाजूला झाकून ठेवायचा.
लोखंडी तव्यात तेल घालून मध्यम gas वर तवा गरम करायला ठेवायचा.
एका पसरट ताटलीत तांदुळाच पीठ पसरून घ्यायचं.
त्यात ह्या marinated माश्याचा तुकडा दोन्ही बाजूने घोळवून गरम तेलात सोडायचा.
एका बाजूने खरपूस भाजून झाला की दुसऱ्या बाजूला परतायचा.
आता गरम गरम वाफाळलेल्या भात आणि सोलकढी सोबत वाढायचा.
एकूण वेळ: ४५ मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी






Thanks For Sharing this amazing recipe. My family loved it. I will be sharing this recipe with my friends. Hope the will like it.