
कृष्ण जन्माष्टमीनिमित्त रात्री बारा वाजता झटपट प्रसादाला काय करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर असे पटकन होणारे प्रसादाचे पोहे बनवून बघा.
नारळ खरवडून ठेवला असेल तर अगदी १० मिनटात हे गुळ पोहे तयार होतात. सकाळच्या वेळी नाष्ट्यासाठीही ही recipe अगदी पौष्टिक आणि पोटभरीची होते.

हा लगेच करून लगेच खाण्याचा पदार्थ आहे. ओलं खोबरं असल्यामुळे हे पोहे ४ ते ५ तासांत खायचे. तुम्हाला जर कमी कॅलरीज मध्ये गोडाचा शिरा बनवायचा असेल किंवा दुधी हलवा तर लिंक खाली दिली आहे.
साहित्य
दिड वाटी पातळ पोहे
पाऊण वाटी किसलेला गुळ
अर्धा वाटी खवलेले ओलं खोबरं
१ मोठा चमचा साजूक तूप
पाव चमचा सुंठ पावडर
अर्धा चमचा वेलची पूड
चिमुटभर मीठ
१ चमचा काजूचे तुकडे
एक चमचा काळे तीळ
कृती
एका पळीत किंवा फोडणीच्या भांड्यात तूप गरम करून घ्यायचं.
तूप गरम झालं की त्यात काळे तीळ आणि काजूचे तुकडे घालायचे.
काजू सोनेरी रंगाचे झाले की gas बंद करायचा. आणि तूप थंड करायला ठेवायचं.
आता एका मोठ्या वाडग्यात पोहे घ्यायचे. त्यात खोबरं, गुळ, वेलची पूड, मीठ, सुंठ पावडर आणि तूप घालायचं.
सगळे पदार्थ हाताने एकत्र करायचे आणि लगेचच खायला घ्यायचं.
तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: १ मिनटे
वाढणी: २ जणांसाठी






Great food photography!
very good. eggless cake kashi banvaychi te kalva.
https://dipsdiner.com/dd/blueberry-muffins-recipe-for-muffins/