
आता lockdown च्या काळात चांगले आंबे मिळणे खूपच कठीण झालेले आहे. आमच्या गावाला फक्त दिडशे रुपये पेटीच्या भावाने मामाला आंबे वाशी मार्केटमध्ये पाठवावे लागत आहेत. दरवर्षी माझा मामा मला २ पेट्या आंबे पाठवतो, त्यामुळे उन्हाळ्यात तशी माझी चंगळ असते. यावर्षी मात्र बाहेरून ५०० रु. डझन आंबे घ्यायचं मनच होत नाही.
हा आंब्याचा केक मी गेल्यावर्षी बनवला होता. आता त्याची कृती इथे मराठीतून देत आहे. यावर्षी आमच्या गावच्या आंब्यांना मी खूप miss करतेय. इथे मिळणारे आंबे खाऊन मनाची तृप्ती होत नाही.
To read Mango Cake Recipe in English click here.

आंबा असाच कापून खाण्यापेक्षा मग मी, आंब्याचा शिरा, आंबा बर्फी, आमरस किंवा मग आंब्याचा क्रीम केक बनवून आंब्याचा आस्वाद घेते.
तुमचे नेहमीचे आंब्याचे स्रोत ह्या lockdown मध्ये उपलब्ध आहेत का हे मला नक्की कळवा. तुम्हाला अजून कुठच्या आंब्याच्या recipe बघायला आवडतील तेही सांगा. मी त्या नक्की बनवून, इथे कृती देण्याचा प्रयत्न करेन. लवकरच मी मुरांम्बा बनवणार आहे. तेव्हा परत आपली हितगुज होईलच. आता कृती बघूया.
साहित्य
१२० ग्राम आंब्याची साल काढून, गराचे तुकडे
१३० ग्राम मैदा
१३० ग्राम पीठी साखर
५० ग्राम तेल
४५ ग्राम घट्ट दही
५ मिली लिंबाचा रस
३/४ छोटा चमचा खाण्याचा सोडा
१/४ छोटा चमचा बेकिंग पावडर
३/४ छोटा चमचा वेलची पूड
चिमूटभर मीठ
कृती
अव्ह्नला 180oC ला १० मिनिटांसाठी गरम करायला ठेवायचा.
केकच्या साच्याला आतून सर्व बाजूने तेलाचा हात लावून घ्यायचा.
मैदा, खायचा सोडा, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र चाळून घ्यायचं.
हे चाळेलेल मैद्याचं मिश्रण एका छोट्या वाडग्यात ठेवायचं.
एका मोठ्या पसरट भांड्यात साखर, आंब्याचा गर आणि दही घ्यायचं.
आता एका hand ब्लेन्डेरच्या साह्याने मध्यम गतीवर हे सगळं फेटून घ्यायचं.
हे सगळे एकत्र झाले की त्यात तेल, लिंबाचा रस आणि वेलची पूड घालून अत्यंत कमी वेगाने फेटून घ्यायचं.
आता ह्यात मैद्याचे मिश्रण घालून हातानेच जास्त वेळ न ढवळता cut & fold रीतीने केकचं मिश्रण बनवायचं.
आता हे केकचं मिश्रण साच्यात टाकून, मधल्या जाळीवर अव्हन मध्ये भाजायला ठेवायचं.
180oC ला २५ मिनिटे बेक केल्यावर केक तयार होईल.
तयारीसाठी लागणारा वेळ: २० मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: २५ मिनिटे
वाढणी: १० medium slices






Leave a Reply