मुंबईची चमचमीत पाव भाजी
पाव भाजी म्हटले की अस्सल मुंबईकराच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. पाव भाजीच्या गाड्या मुंबईच्या रस्त्यावर आम्ही आमच्या लहानपणापासून बघतोय. गरम तव्यावर लोण्यात घोळवलेल्या भाजीच्या सुगंधाने तर, पोट भरलेले असेल तरी परत भूक लागेल आणि नक्कीच तोंडाला पाणी सुटेल.
आता वाढलेली महागाई बघता, रस्त्यावर मिळणाऱ्या पाव भाजीची चव टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळे, आपल्या आरोग्यास घातक असे पदार्थ घालून भाजी बनवण्यात येऊ लागली आहे. हे गाडीवाले सकाळ सकाळ मंडईत जाऊन सडलेल्या कांद्या-टोमाटोचे क्रेट अगदी कवडी मोल्याच्या भावाने खरेदी करतात. हे कांदे-टोमाटो दुपारी निवडून, सडलेले भाग कापून उरलेले चिरून रात्री भाजी करायला वापरतात. लाल रंगाचातर अगदी सढळ हस्ताने वापर करतात. शिवाय बटर म्हणून मार्र्जरीन किवां हलक्यातले टेबल स्प्रेड वापरतात. मी त्यांना पाम तेल वापरतानाही पाहिलेले आहे. भाजीला घट्टपणा येण्यासाठी मक्याच्या पिठाचा वापर करतात.
हे सर्व माहीत असूनही रस्त्यावर पावभाजी खाण्याचा मोह आवरता येणे कठीण आहे. मी तुम्हाला अतिशय सोपी अशी पावभाजीची पाककृती सांगणार आहे. मला मान्य आहे की, ह्या पद्धतीने करायला थोडा जास्त वेळ लागतो, पण तुम्ही एकदा करून, चाखून तर बघा, परत तुम्ही रस्त्यावर पावभाजीकडे वळूनही बघणार नाहीत.
तुम्ही पाव सुद्धा घरी बनवू शकता, पण एकाच दिवशी पाव आणि भाजी दोन्ही बनवू नका, थकून जाल आणि भाजी चांगली होणार नाही. पाव बाहेरून आणा आणि चमचमित, रुचकर अशी भाजी घरी बनवा.
मला माहीत आहे की, घरी बनवताना आपण अगदी आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक पदार्थ तोलून मापून घालतो, पण पाव भाजी करताना जरा लोण्याचा सढळ हाताने वापर करा. १०० दोरीच्या उड्या जास्त मारून नंतर कॅलरीज बर्न करा.
साहित्य
300 ग्रॅम (3 मध्यम आकाराचे) बटाटे उकडून, साले काढून, कुस्करून
३०० ग्रॅम (५-६ मध्यम आकाराचे)कांदे सोलून, बारीक चिरून
३५० ग्रॅम (५-६ मध्यम आकाराचे)टमेटो बारीक चिरून
१०० ग्रॅम (अर्धी वाटी)वाटणे वाफवून (किंवा फ्रोझन)
१०० ग्रॅम (१ मोठी)ढोबळी (सिमला) मिरची बारीक चिरून
२० ग्रॅम (१२-१३ पाकळ्या)लसूण वाटून
१.५ मोठा चमचा तेल
२ हिरव्या मिरच्या चिरून
१ छोटा चमचा जीरे
दोन लिंबाचा रस
एक छोटा चमचा मीठ
२ मोठे चमचे लोणी (बटर)
सुखे मसाले:
१ छोटा चमचा लाल तिखट
१ छोटा चमचा काश्मिरी लाल मिर्ची पावडर
२ छोटे चमचे पाव भाजी मसाला
सजावटीसाठी:
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
बारीक चिरलेला कांदा
लिंबाच्या फोडी
कृती
एका पसरट भांड्यात तेल घालून, भांडे मध्यम आचेवर ठेवावे.
तेल गरम झाल्यावर त्यात जिरे घालून तडतडू द्यावे.
आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा.
कांदा मधे मधे परतून चांगला मातकट रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा.
साधारण ८ ते १० मिनटे कांदा शिजायला लागतील, घाई करू नये.
कांदा मातकट रंगाचा झाल्यावर त्यात कुटलेली लसूण टाकावी.
२ मिनटे परतून ह्यात टमेटो घालावेत.
टमेटो चांगले एकजीव होईपर्यंत मिश्रण मधे मधे परतत राहावे.
टमेटो, कांदा आणि लसूण छान मऊ, एकत्र झालेकी त्यात ढोबळी मिरची घालावी.
थोडेसे पाणी टाकून, ढोबळी मिरची झाकण लावून शिजू द्यावी.
५ मिनिटांनी झाकण काढून त्यात कुस्करलेले बटाटे आणि पाणी टाकावे.
आता हयात मीठ आणि वरील साहित्यात दिलेले सर्व सुखे मसाले टाकावे.
सर्व मिश्रण ढवळून, पावभाजी साठी वापरण्यात येण्याऱ्या यंत्राने छान एकजीव करावे.
झाकण ठेवून ५ मिनटे शिजू द्यावे.
झाकण काढून, त्यात मटारचे दाणे घालावेत. २ मिनटे भाजी उकळू द्यावी.
चव बघून, मीठ-तिखट हवे असल्यास घालावे.
आता gas बंद करून लिंबाचा रस, कोथिंबीर आणि लोणी घालून गरमागरम खायला घ्यावी.
तयारीसाठी लागणारा वेळ: ३० मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: ४० मिनटे
वाढणी: ४ जणांसाठी
पोषण मुल्ये
एकूण उष्मांक: १०३५.०६ Kcal
मेद: ४२.८४ ग्रॅम
प्रथिने: २१.३५ ग्रॅम
कर्बोदके: १५१.७९ ग्रॅम
लोह: ७.९७ मि. ग्रॅम






Nyc
Best
Nice….
Thank You!
mast
Khup testi recipe thanks
आपला अभिप्राय कळवल्याबाबत धन्यवाद!
छान आहे ना
Thanks
Maast receipe. Enjoyed the pav bhaji 👌👌👌 Thank you.
Thanks
Nice
👌👌👌
Thanks for the very great info
nice
Thanks
Nice… Thanx
mast recipe
Mast
Fantastic……..recipe
Ek no…..osm
thanks
Mast ekdam sopi aahe
Aamhi try kartoy
Mastch
Nice. I enjoyed a lot.
Nice
1ch no
Hey, your blog is really nice to read. All the receipes are fantastic. And I want your review in mine.