
होळी, गणपती किंवा नवरात्रात प्रसादासाठी पुरणपोळी ही लागतेच. काहीजण गौरीच्या नेवेद्याला किंवा पिठोरी अमावसेला तेलपोळीही करतात. खुसखुशीत, जिभेवर टाकताच विरघळणारया पोळ्यांची बातच काही और आहे.
मला मात्र लहानपणापासूनच पुरणपोळी आवडत नाही. एकदा आमच्या परिचयाच्या काकींनी आमच्या आईला तेलपोळी शिकवली. त्यांनी खूप मोठा पत्रा आणला होता. त्यावर अतिशय पातळ अशा पोळ्या लाटून मोठ्या तव्यावर शेकल्या होत्या. त्यावेळी मात्र मला त्या खुस्कुशीत पुरणपोळ्या खूप खूप आवड्ल्या. पण ह्या पोळ्या चणाडाळीपासून बनलेल्या असतात आणि ते खाल्यावर मला लगेचच पित्त होते.
आज मी ह्या पोळ्या मूंगडाळीपासून बनवल्या आहेत. अतिशय थोडासा मैदा वापरला आहे. तेलाऐवजी साजूक तुपावर भाजल्या आहेत. ह्या पोळ्या तुम्ही एकदा बनवून बघा. तुम्हीसुद्धा चणाडाळीच्या पुरणपोळ्या विसरून जाल.
पुरण बनवण्यासाठी एक शोर्टकट वापरला आहे. ह्या पोळ्या आळशी लोकांना बनवण्यासाठी एकदम बेस्ट आहेत. तुम्ही मला नक्की सांगा तुम्हांला आवडल्या का?

सणासुदीच्या काळात जर तुम्हाला पटकन आणि चविष्ट गोड पदार्थ बनवायचे असतील तर खाली ह्या लिंक दिल्या आहेत.
साहित्य
३० मिली. साजूक तूप शेकण्यासाठी
पूरणासाठी:
१०० ग्राम मुगाची डाळ
८० ग्राम गुळ
४० ग्राम साखर
अर्धा चमचा जायफळ पूड
१ छोटा चमचा तूप
चिमूटभर मीठ
पोळीसाठी:
५० ग्राम मैदा
१५० ग्राम गव्हाचे पीठ
अर्धा छोटा चमचा मीठ
२ मोठे चमचे तेल
कृती
मूगडाळ धुवून ३ तास भिजवून घ्यावी.
कुकरच्या भांड्यात पाणी उपसून मुगडाळ २ मोठेचमचे पाणी घालून शिजवून घ्यावी.
शिजवलेली मुगडाळ गरम असतानाच व्हीस्क्च्या साह्याने चांगली मऊसूत होईपर्यंत घोटून घ्यावी.
आता एका nonstick pan मध्ये १ छोटा चमचा तूप, घोटलेली मूगडाळ, गुळ आणि साखर घालावी.
सतत ढवळत गुळ, डाळ आणि साखर एकजीव झाले की त्यात वेलची आणि जायफळ पूड घालावी.
आता परत एकदा सगळे एकत्र करून २ मिनटे परतून पुरण थंड करायला ठेवावं.
पोळीसाठी वर सांगितलेले साहित्य एका परातीत घ्यावं.
सगळं कोरडच एकत्र करून प्रथम १ चमचा तेल घालावं.
आता थोडं थोडं पाणी घालून कणिक भिजवावी. कणिक मळत आली की राहिलेलं एक चमचा तेल घालून ३ ते ४ मिनटे कणिक चांगली तिंबून घ्यावी.
आता कणिक झाकून एक तास बाजूला ठेवावी.
आता कणिक आणि पुरण यांचे एकसारखे १८ गोळे करून घ्यावे.
आता कणकेची पुरी लाटून त्यात पुरण भरून बंद करून घ्यावी.
आता थोडसं सुखं पीठ घेऊन अतिशय पातळ अशी पोळी लाटावी.
तव्यावर मध्यम आचेवर तूप लावून दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घ्यावी.
अशाच तह्रेने सगळ्या पोळ्या करून घ्याव्यात.
तयारीसाठी लागणारा वेळ: ३ तास
शिजण्यासाठी लागणारा वेळ: ४० मिनटे
वाढणी: १८ नग

Leave a Reply