अळुवडी
श्रावण महिना म्हटलं की अळू वडी पानात नाही असे कोकणातील घर विरळाच. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे.
अळूची पाने दोन प्रकारची असतात. ज्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात ती पाने अळुवडीसाठी वापरतात. तुम्ही बाजारातून घेताना नीट बघून घ्या. भाजीचं अळू आणि वडीचं अळू अशी साधारण वर्गवारी भाजीवाले करतात.
अळूच्या पानांचा महिन्यातून दोनदा ते तीनदा आपल्या आहारात जरूर समावेश करावा. खूप तंतुमय पदार्थ असल्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी किंवा मधुमेही लोकांसाठी अळू अतिशय उपयुक्त आहे. A, B6 आणि C जीवनसत्वे यामध्ये खूप प्रमाणात असतात. तुमचे जर युरिक एसिड(Uric Acid) वाढलेले असेल, गुडघेदुखी किंवा सांधेदुखीची तक्रार असेल तर अळू खाणे टाळावे.
To read this recipe in English please Click Here ‘Alu Vadi Recipe‘.
साहित्य
५-६ मोठी अळूची पाने
तेल तळण्यासाठी
बेसन मिश्रण बनवण्यासाठी
१ वाटी (१५० ग्राम) चण्याच्या डाळीचे पीठ (बेसन)
१ मोठा चमचा चिंचेचा कोळ
१ मोठा चमचा किसलेला गुळ
११/२ छोटा चमचा लाल तिखट
१/२ छोटा चमचा गरम मसाला पावडर
१/२ छोटा चमचा हळद
१ छोटा चमचा मीठ
१ मोठा चमचा गोडा मसाला (ऐच्छिक)
कृती
‘बेसन मिश्रण बनवण्यासाठी’ लागणारे सर्व साहित्य एका मोठ्या वाडग्यात घ्यावे.
थोडे थोडे पाणी घालून सर्व एकत्र करून, घट्ट पेस्ट बनवून घ्यावी.
आता अळूची सगळी पाने देठ कापून स्वच्छ धुवून, पुसून घ्यावीत.
पाने उलटी करून जर काही जाड्या शिरा अस्तील तर कापून घ्याव्यात.
सगळी पाने उलटी करून त्यावर लाटणे फिरवून घ्यावे.
सगळ्यात मोठे पान उलटे ठेवून त्यावर बेसन पेस्ट पसरवून घ्यावी.
आता दुसरे पान त्यावर उलटे ठेवून त्यावरही पेस्ट लावून घ्यावी.
अशा तऱ्हेने सगळी पाने एकावर एक लावून सगळ्यांना पेस्ट लावावी.
ह्या सगळ्या पानांची घट्ट गुंडाळी करावी.
आता ही गुंडाळी मोदकपात्रात १२-१३ मिनटे उकडून घ्यावी.
उकडल्यावर हा उंडा थंड करून घ्यावा.
थंड झाल्यावर ह्याच्या एकसमान आकाराच्या वड्या कापाव्यात.
ह्या वड्या गरम तेलात खरपूस तळून घ्याव्यात.
तयारीसाठी लागणारा वेळ: ३५ मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: २० मिनटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी
पोषण मुल्ये
एकूण उष्मांक: २३१.५ Kcal
मेद: १५.५६ ग्रॅम
प्रथिने: ५.०४ ग्रॅम
कर्बोदके: २५.३ ग्रॅम
तंतूमय पदार्थ: ३.६८ ग्रॅम
To read this recipe in English please Click Here ‘Alu Vadi Recipe‘.






Leave a Reply