
भेंडी भुना मसाला
भेंडी माझी फारच प्रिय भाजी आहे. आठवड्यातून दोनदा तरी भेंडी आमच्या घरी बनतेच. प्रत्येकवेळी वेगवेगळी रेसिपी करून बघायला मला खूप आवडते. ह्या ब्लॉगवर सुद्धा मी खालील भेंडीच्या पाककृती दिल्या आहेत.

ही भाजी झटपट ह्या प्रकारात मोडणारी नाही. ह्यासाठी कांदा टोमाटो कापायला लागतो. भेंडी सुद्धा वेगळी परतून घ्यावी लागते. आम्ही राजस्थानला गेलो होतो तेव्हा बऱ्याच ढाब्यांवर आम्ही ही भाजी खाल्ली होती. ही रेसीपी तिथूनच प्रेरित होऊन बनवली आहे.
साहित्य
५०० ग्रॅम भेंडी स्वछ धुऊन, सुकवून, १ इंचाचे तुकडे करून
१२० ग्रॅम (२ मध्यम) कांदे सोलून, उभे उभे चिरून
३०० ग्रॅम (४ मध्यम) टोमाटो, बिया काढून, उभे उभे चिरून
१ मोठा चमचा तेल
१ छोटा चमचा मीठ
मुठभर कोथिंबीर बारीक चिरून
१ लिंबाचा रस
फोडणीसाठी:
१ मोठा चमचा तेल
७-८ कढीपत्त्याची पाने
७-८ लसूण पाकळ्या ठेचून
१ छोटा चमचा जीरे
पाव छोटा चमचा हळद
४-५ मिरच्या मोठे तुकडे करून
सुखे मसाले:
१ मोठा चमचा सब्जी मसाला / मिक्स मसाला
पाव चमचा गरम मसाला
कृती
काढईमध्ये तेल घेऊन कढई मध्यम आचेवर गरम होण्यास ठेवायची.
तेल गरम झाल्यावर त्यात भेंडीचे तुकडे फ्राय करायचे.
झाकण न ठेवता ५ ते ७ मिनटे परतून घ्यायचे.
शेवटी चवीप्रमाणे मीठ आणि एका लिंबाचा रस घालून शिजवलेली भेंडी बाजूला काढून ठेवायची.
परत त्याच काढईमध्ये तेल घेऊन कढई मध्यम आचेवर गरम होण्यास ठेवायची.
आता त्यात फोडणीसाठी दिलेले साहित्य घालायचे.
लसूण परतला की चिरलेला कांदा घालायचा.
२ मिनटे कांदा तेलात परतून घ्यायचा. थोडे मीठ घालायचे.
२ मिनटे परतल्यावर, कांदा चांगला मऊ गुलाबी झाल्यावर टोमाटो च्या फोडी घालायच्या.
टोमाटो जास्त शिजवायचा नाही, २ मिनिटच परतून घ्यायचा.
आता मीठ, सब्जी मसाला आणि गरम मसाला घालून भाजी एकत्र करायची.
आता ह्यात fry केलेली भेंडी घालून परतायची.
वरून भरपूर कोथिंबीर घालून एकत्र करून gas बंद करायचा.
आता गरमागरम फुलक्यांसोबत भाजी खाण्यास घ्यायची.
तयारीसाठी लागणारा वेळ: २० मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: २५ मिनटे
वाढणी: ५ ते ६ जणांसाठी

Leave a Reply