
इंडो चायनीज डिश
तुम्हांला Non-Veg डिशेस आवडत असतील तर ही चिकन चिल्लीची gravy तुम्हांला नक्की आवडेल. तसं इंडो चायनीज recipes शिजायला वेळ लागत नाही, पण त्याच्या तयारीसाठी खूप वेळ लागतो, पण ह्या चिकन डिशसाठी जास्त वेळ लागत नाही. सुरवाती पासून आपल्या पानात पडे पर्यंत फक्त २० ते २५ मिनिटे लागतात.
ही झटपट बनणारी डिश, बनवायला अगदी सोप्पी आहे. तुमच्या घरी पार्टी असेल किंवा तुम्हांला मोठ्या प्रमाणात ही gravy बनवायची असेल तर चिकनचे तुकडे आधीच तळून ठेवा. लसूण आणि भोपळी मिरचीही आधी चिरून ठेवली तर फक्त १० मिनिटांत गरम गरम बनवून तुम्ही fried rice किंवा noodles सोबत serve करू शकता.
तुम्हांला अजून अशा झटपट बनणाऱ्या इंडो-चायनीज dishes बघायचा असतील तर खाली मी लिंक दिल्या आहेत.
साहित्य:
पाव किलो बोनलेस चिकन, स्वच्छ धुवून छोटे चौकोनी तुकडे करून
१ मोठी भोपळी मिरची, मोठे मोठे चौकोनी काप कापून
२ वाट्या तेल तळण्यासाठी
२ मोठे चमचे बारीक चिरलेली लसूण
२ पातीचे कांदे बारीक चिरून
२ हिरव्या मिरच्या २ इंचाच्या तुकड्यात कापून
१ मोठा चमचा मक्याचं पीठ अर्धा वाटी पाण्यात घोळवून
१ छोटा चमचा डार्क सोया sauce
अर्धा छोटा चमचा विनेगर
अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर
चवीनुसार मीठ
पाव चमचा काळे मीठ
चिमुटभर अजिनोमोटो (ऐच्छिक)
चिमुटभर साखर
१ कप पाणी
चिकन मुरवण्यासाठी:
अर्धा छोटा चमचा डार्क सोया sauce
अर्धा छोटा चमचा विनेगर
अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर
चवीनुसार मीठ
पाव चमचा काळे मीठ
चिमुटभर अजिनोमोटो (ऐच्छिक)
२ मोठे चमचे मैदा
१ मोठा चमचा corn फ्लोर
सजवण्यासाठी:
कांद्याची पात बारीक चिरून
कृती:
चिकनच्या तुकड्यांना मुरवण्यासाठीचे वर दिलेले सगळे साहित्य घालून चांगले मिसळून मुरण्यासाठी १० ते १५ मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं.
एका कढईत तेल गरम करून एक-एक करून chicken चे तुकडे सोडून, मध्यम आचेवर सोनेरी-तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे.
आता एका कढईत, एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवायचं.
तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेली लसूण, कांद्याचा बारीक चिरलेला पांढरा भाग आणि मिरचीचे २-३ मोठे तुकडे टाकायचे.
अर्धा मिनिटभर परतल्यावर gas मोठा करून त्यात भोपळी मिरचीचे तुकडे टाकायचे.
२ मिनिटे हे तुकडे मोठा gas करून परतले की gas बारीक करायचा.
ह्यात मीठ, काळ मीठ, अजीनोमोटो, काळी मारी पावडर, विनेगर, सोया sauce घालून एकदा परतून घ्यायचं.
आत्ता ह्यात तळलेले चिकनचे तुकडे घालायचे.
तुम्हांला ज्या प्रमाणात gravy हवी असेल तेव्हढे पाणी घालायचे. अगदी चिमुटभर साखर घालायची.
पाणी उकळले की, त्यात corn फ्लॉर घातलेलं पाणी घालायचं.
एक उकळी आली की gravy घट्ट झाली की gas बंद करायचा.
तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनटे
भिजण्यासाठी लागणारा वेळ: १५ मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: १५ मिनटे
वाढणी: २-३जणांसाठी






Wow superr!!