
कोरोना काळात, बाहेर जाऊन chinese टपरीवर खाणेपिणे काही काळासाठी तर पूर्णपणे बंद झालं असलं तरी घरी तसेच Indo-chinese पदार्थ बनवून आपण दुधाची तहान ताकावर भागवू शकतो. चव, स्वच्छता आणि घरी चांगल्या प्रतीचे पदार्थ वापरल्यामुळे, घरी केलेले हे देशी-chinese items लागतात तर एकदम tasty,पण भाज्या कापणे, भात-noodles शिजवणे ह्यात जो वेळ जातो ते बघता एकदा बाहेरूनच खाऊन आलो तर परवडेल अशी घरच्या गृहिणींची मते असतील.
माझही काहीसं तसचं मत आहे. chinese बनवण्यासाठी जी पूर्वतयारी लागते, पसारा होतो, kichen आवरण्यात, भांडी घासण्यात जो वेळ जातो, त्यानंतर असं वाटतं की बाहेर जाऊन खाऊन आलं तरचं बरं. आणि हो सगळ्या भाज्या आणि sauce वैगरे पदार्थांची जमवाजमव करण्यासाठी १ मार्केटची फेरीही वाचते. तुमचं या बद्धल काय मत आहे ते मला नक्की खाली comment करून सांगा.
त्यातल्यात्यात Egg fried rice, prawns fried rice बनवण्यासाठी कमी तयारी आणि खूपच कमी वेळ gas समोर जातो. chicken chili ची recipe या आधी मी दाखवली आहे. त्यात chicken deep fry केलं होते. mushroonm chili ची recipeही post केली आहे. त्यात मी मशरूम deep fry किंवा shallow fry न करता वापरले आहेत. मशरूम fried rice चीही recipe तुम्ही वाचू शकता.
इथे पनीर चिल्ली(paneer chili) बनवण्यासाठी मी पनीर deep fry केलेलं नाही. पहिल्यांदा मी ते deep fry करून वापरायचे, पण gravy मध्ये टाकताच त्याचं वरचं coating निघून जायचं. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा. मला नक्की सांगा तुम्हांला आवडलं की नाही.

साहित्य:
पाव किलो पनीर चौकोनी १ इंचाचे तुकडे करून
१ छोटा चमचा corn flour १०० ml. पाण्यात घोळवून
पनीर marinate करण्यासाठी
१ छोटा चमचा शेजवान sauce
अर्धा छोटा चमचा सोया sauce
अर्धा छोटा चमचा विनेगर
पाव छोटा चमचा मीठ
पाव छोटा चमचा काळीमिरी पावडर
पाव छोटा चमचा चाट मसाला
१ मोठा चमचा corn flour
२ मोठे चमचे मैदा
Gravy बनवण्यासाठी
१ ढोबळी मिरची मोठ्या चौकोनी तुकड्यात कापून
१ मोठा कांदा मोठ्या चौकोनी तुकड्यात कापून
२ मोठे चमचे तेल
१ मिरची मोठे तुकडे करून
१ मोठा चमचा बारीक चिरलेली लसूण
अर्धा छोटा चमचा बारीक चिरलेलं आलं
ग्रेवीच्या चवीसाठी
पाव छोटा चमचा मीठ
पाव छोटा चमचा काळमीठ
पाव छोटा चमचा काळीमिरी पावडर
चिमुटभर साखर
१ छोटा चमचा सोया sauce
अर्धा छोटा चमचा विनेगर
१ छोटा चमचा लाल मिरची पेस्ट किंवा शेजवान sauce
पाव छोटा चमचा अजिनोमोटो (ऐच्छिक)
कृती:
एका भांड्यात ‘पनीर मुरवण्यासाठी’ दिलेलं सर्व साहित्य घ्यायचं.
त्यात अगदी थोडं थोडं पाणी घालत सगळं मिक्स करून घेत घट्ट अशी पेस्ट तयार करायची.
पनीरचे तुकडे घेऊन त्यावर ही पेस्ट ओतून घ्यायची.
अतिशय हळुवारपणे प्रत्यक पनीरच्या तुकड्याला ही पेस्ट लावून घ्यायची.
आता हे तुकडे marinate करण्यासाठी बाजूला ठेवायचे.
एका non-stick pan मध्ये २ चमचे तेल गरम करायला ठेवायचं.
तेल गरम झाल्यावर त्यात हे पनीरचे तुकडे shallow fry करून घ्यायचे.
Golden-Brown रंगाचे झाल्यावर सर्व पनीरचे तुकडे, तेल निथळून एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायचे.
आता राहिलेल्या तेलात, बारीक चिरलेली लसूण, आलं आणि एक मिरची टाकायची.
लसूण लाल होईपर्यंत हे सगळं परतत राहियचं. एकदा का लसूण लालसर तांबूस झाला की मोठे मोठे कांदा आणि शिमला मिरचीचे तुकडे टाकायचे.
मिरचीवर brown असे चट्टे दिसायला लागले की त्यात लाल मिरचीची पेस्ट टाकायची.
आता वर दिलेले ‘ ग्रेवीच्या चवीसाठी‘ सगळे पदार्थ घालायचे. पाऊण ग्लास पाणी घालायचं.
पाण्याला उकळी आली की corn flourची पेस्ट टाकायची. सतत ढवळत राहायचं.
आता ही gravy घट्ट होत येईल. शेवटी त्यात fry केलेलं पनीर टाकायचं.
हलक्या हाताने एकदा ढवळून लगेचंच gas बंद करायचा.
मस्त veg fried rice किंवा मुश्रूम fried rice सोबत खायला घ्यायचं.
तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनटे
भिजण्यासाठी लागणारा वेळ: १५ मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: १५ मिनटे
वाढणी: २-३जणांसाठी

Leave a Reply