
आज मी तुम्हाला आमची आज्जी जसे बनवायची तसेच अगदी दडपे पोहे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. दडपे पोहे पातळ पोह्या पासून बनतात. आता जो ट्रेंड आलाय लाईट ब्रेकफास्ट करण्याचा मला तर वाटतं आपल्या गावाला हे पहिल्यापासूनच फॉलो होत आलंय.
पोहे ग्लूटन-फ्री असल्यामुळे तो एक चांगला पौष्टिक नाष्टा असतो. कधीकधी पातळ पोहे थोडे नरम पडतात. मी as a पार्ट ऑफ मिल प्लॅनिंग, वीकेंडला हे पातळ पोहे कडक उन्हात दोन ते अडीच तासांत साठी ठेवून नंतर हवाबंद डब्यात ठेवून देते.
गावाला हे दडपे पोहे जास्त करून दुपारच्या वेळात बनवले जातात. आमच्या लहानपणी गावाला फ्रीज नव्हता तेव्हा नारळ फोडून, तो खरवडून भरपूर नारळाचा चव आणि नारळाचं पाणी वापरून आज्जी आमच्यासाठी हे दडपे पोहे बनवायची.
साहित्य :
दोन वाट्या पातळ पोहे
अर्धी वाटी खवलेला नारळ
पाव वाटी नारळाचं पाणी
चवीपुरतं मीठ
एक छोटा चमचा साखर किंवा गुळ
दोन मोठे चमचे कच्चे शेंगदाणे
एक हिरवी मिरची मोठ्या मोठ्या तुकड्यात कापून
कोथिंबीर बारीक चिरून
एक कांदा मध्यम आकाराचा चिरून
चार-पाच कढीपत्त्याची पाने
एक मोठा चमचा तेल
एक छोटा चमचा जिरे
एक छोटा चमचा लिंबू रस
कृती:
दोन वाट्या पातळ पोहे एका बोल मध्ये घ्यायचे.
आता त्यात एक मध्यम चिरलेला कांदा ,बारीक चिरलेली कोथिंबीर, खूप सार ओले खोबरे, गूळ किंवा साखर, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं.
थोडं थोडं नारळाचं पाणी घालून हे पोहे आणि घातलेले अन्न जिन्नस छान एकत्र कालवून घ्यायचे .
पाणी खूप घालून काला करायचा नाही नारळ पाणी नसेल तर साधे पाणी वापरलं तरी चालेल.
असे हे मस्त कालवून झाले की पोहे पाच ते दहा मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवायचे तोपर्यंत फोडणीची तयारी करायची.
फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम करायला ठेवायचं.
त्यात कच्चे शेंगदाणे घालायचे. दोन ते तीन मिनिटं कच्चे शेंगदाणे तेलात मस्त फ्राय करून कुरकुरीत करून घ्यायचे.
त्यात एक छोटा चमचा जीरे टाकायचं. मस्त फुललं की त्यात मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता टाकायचा.
आता ही फोडणी आपल्या दडपलेल्या पोह्यांवर ओतायची.
एका चमच्याच्या साह्याने हे दडपे पोहे एकत्र करायचे. चव बघायची मीठ साखर काही कमी वाटलं तर आत्ताच टाकून घ्यायचं.
खाताना मस्त लिंबू पिळून संध्याकाळचे छोट्या भुकेसाठी खायला द्यायचं.
तयारीसाठी लागणारा वेळ: १५ मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: ५ मिनटे
वाढणी: २-३’जणांसाठी






Leave a Reply