दुधी हलवा
दूधी हलवा खायला आणि करायला कोणत्याही विशेष समारंभ किंवा उत्सवाची गरज नसते. दूधी बाराही महिने बाजारात उपलब्ध असतात त्यामुळे जेव्हा खायची इच्छा होईल तेव्हा दूधी हलवा सहज बनवता येईल.
जेव्हा मी तीन-चार वर्षापुर्वी ही पाककृती इंग्रजी भाषेत लिहिली होती तेव्हा माझ्याकडे स्टीलचा कूकर नव्हता. त्यामुळे ती कृती थोडी वेगळी आहे. आता खाली दिलेल्या कृतीत एकाच कुकरमध्ये सुरवातीपासून शेवटपर्यंत हा हलवा अतिशय सोप्या रीतीने आणि पटकन बनवता येतो. कूकरचे भांडे जाड बुडाचे असल्याने सतत ढवळत बसावे लागत नाही.
जर तुमच्या हलव्याला काळपट रंग येत असेल किंवा तुम्हाला कोणताही रासायनिक रंग न वापरता हलवा बनवायचा असेल तर खालील कृती करून बघा.
To read this recipe in English please Click Here ‘Dudhi Halwa Recipe’.
साहित्य
४०० ग्रॅम(३ वाट्या)दुधीचा कीस
२०० ग्रॅम (१ वाटी) साखर
१०० ग्रॅम (अर्धी वाटी) मावा
२०० मिली ( १ वाटी) म्हशीचे दुध
१ चमचा साजूक तूप
पाऊण छोटा चमचा वेलची पूड
२ मोठे चमचे बदाम-पिस्ता काप
कृती
दूधी किसून, कीस पाण्यात भिजवून ठेवावा.
कूकरच्या भांड्यात तूप आणि दुध घालून, हे भांडे मध्यम आचेवर गरम होण्यास ठेवावे.
पाण्यातून कीस चांगला पिळून गरम दुधात टाकावा.
सर्व चांगले एकत्र करून, कुकरचे झाकण लावून दोन शिट्या झाल्यावर gas बंद करावा.
१०-१५ मिनिटांनी कुकरचे झाकण उघडून, कूकर पुन्हा मंद आचेवर ठेवावा.
५-७ मिनटे ढवल्यावर सर्व दुध आटून जाईल, त्या वेळी त्यात साखर आणि मावा घालावा.
परत सर्व एकत्र करावे. साखर घातल्यावर मिश्रण परत पातळ होईल.
८-१० मिनटे मध्ये-मध्ये ढवळत राहावे. थोडेसे पातळ असतानाच gas बंद करावा.
थंड झाल्यावर हा हलवा थोडा घट्ट होतो. काचेच्या भांड्यात काढून हलवा फ्रीजमध्ये ठेवावा.
तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: ३० मिनटे
वाढणी: ४ जणांसाठी
पोषण मुल्ये
एकूण उष्मांक: १५५८.१ Kcal
मेद: ५३.८४ ग्रॅम
प्रथिने: २५.६६ ग्रॅम
कर्बोदके: २४२.५७ ग्रॅम
लोह: ८.९१९ मि. ग्रॅम
To read this recipe in English please Click Here ‘Dudhi Halwa Recipe’.






Jar ya made duda evzi jar. Pani vaprlat tar chalel ka?
घट्ट साईच्या दुधाचे प्रमाण वाढवून, मावा घातला नाही तरी चालेल…पण पाण्यात शिजवला तर चवीला फारसा चांगला लागणार नाही. मी कधी पाणी टाकून शिजवलेला नाही, पण calories कमी करण्यासाठी दुध वगळायचं आहे का?
साधी सोपी पध्दतीने सांगितले आहे , करण्यास सोपे आणि खाण्यासाठी पौष्टिक ,
बनवण्यास एकदम सोपें आहे
बनवण्यास सोपे