
मस्त तळलेले मासे, सोलकढी आणि भात, आहाहा…अजून काय पाहिजे रविवरच्या जेवणात. मांदेली तशी फार नाजूक मच्छी असते. याला फार काही मसाला लावायची आवश्यकता नसते.
मांदेली, बोंबील किंवा मोदकं ही मच्छी साफ करण्यासाठी मला थोडा जास्त वेळ लागतो. मला तुमचं माहित नाही पण हे सर्व मछीचे प्रकार मी बाहेर खाण टाळते. नेहमीच एक शंका मनात घर करते की बाहेच्या लोकांनी एव्हढ निगुतीने मासे साफ केले असतील की नाही.
हे सगळे मासे, घरी अगदी कमी वेळात बनवता येतात. ह्याला मी फार काही वाटप वैगरेही लावत नाही. अगदी सध्या, सोप्या पधतीने ही मांदेली कशी कुरकुरीत रवा फ्राय करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे.
खालील recipe ह्या अगोदर मी दाखवल्या आहेत.
साहित्य:
२०-२२ मांदेली मच्छी, स्वच्छ धुवून, खवले काढून, कल्ले कापून आणि पोटातली घाण काढून
तळण्यासाठी खोबरेल तेल
वरील आवरणाकरता:
३ चमचे बारीक रवा
१ मोठा चमचा तांदूळ पीठ
चवीनुसार मीठ
सुखे मसाले:
अर्धा छोटा चमचा हळद
१ छोटा चमचा मालवणी मसाला
१.५ छोटा चमचा बेडगी मिरची पावडर
चवीनुसार मीठ
१ मोठा चमचा कोकम आगळ
कृती:
सगळी साफ केलेली मच्छी एका वाडग्यात घ्यावी.

आता त्यात वर दिलेले सर्व सुखे मसाले टाकून चांगले घोळवून घ्यावे.

आता झाकून मुरवण्यासाठी कमीत् कमी अर्धा तास तरी बाजूला ठेऊन द्यावे.
वरील आवरणासाठी रवा, तांदुळाच पीठ आणि मीठ एकत्र करून ठेवावं.

फाय pan मध्ये तेल टाकून pan मध्यम आचेवर गरम होण्यास ठेवावा.
आता प्रत्येक मासा रव्यात घोळवून तेलात सोडून द्यावा. तेल गरम झाल्यानंतरच मासे सोडावेत.

तेलात सोडल्यावर एका बाजूने होण्यासाठी ४ ते ५ मिनिटे लागतील.

एका बाजूने पूर्णपणे कुरकुरीत झाला की पालटून दुसय्रा बाजूनेही होऊ द्यावा.

सारखे सारखे पालटू नये. २ ते ३ मिनिटांत दुसरी बाजूही कुरकुरीत होईल.
आता गरमागरम, कुरकुरीत मासे चटणीसोबत खायला घ्यावेत.
तयारीसाठी लागणारा वेळ: ५५ मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: १४ मिनटे
वाढणी: २-३ जणांसाठी






Thanks Guys, Your Recipe Was Too Fantastic. Me and My Family Loved it. I Will Share your Rrecipe with my friends. Hope they will love it too.