
थंडीत लाल दिल्ली गाजरे बाजारात दिसायला लागली की पहिली recipe प्रत्येकाच्या घरी केली जाते ती म्हणजे गाजर हलवा. गाजर हलवा हा अनेक प्रकारे केला जातो. काही जण मावा घालतात काही नुसतीच मलई घालून करतात. अगदी दुधाची पावडर घालूनही गाजर हलवा करता येतो.
दुध, गाजर आणि साखर याचं योग्य प्रमाण वापरले की मस्त tasty असा गाजर हलवा तयार होतो. मी झटपट असा कोणताही हलवा कुकरमध्येच करते. दुधी हलवा मी कसा करते हे या आधी मी दाखवले आहे.
हिवाळ्यात असे अनेक पदार्थ तुम्ही बनवू शकता. खाली मी अश्या लिंक दिल्या आहेत.
खाली मी गाजर हलवा कसा बनवायचा याचा video दिला आहे. दिलेले प्रमाण वापरलेत तर तुमचा गाजर हलवा अतिशय रुचकर होईल.
हा हलवा मी साधारण ७ ते ८ जणांना taste करायला दिला आणि सर्वाना खूपच आवडला. तुम्ही ही recipe करून बघितलीत तर मला नक्की कळवा.
साहित्य:
५०० ग्राम गाजराचा कीस ( गाजर सोलून, धुवून आणि किसून)
२०० मिली. म्हशीचं दुध
२५० ग्राम साखर
१५० ग्राम मावा
१ मोठा चमचा साजूक तूप
१ छोटा चमचा वेलची पावडर
चिमुटभर मीठ
कृती:
एका स्टीलच्या कुकरच्या भांड्यात तूप आणि दुध घालून मध्यम आचेवर गरम होण्यास ठेवायचं.
तूप वितळल की त्यात सर्व किसलेले गाजर आणि चिमुटभर मीठ टाकायचं.
सगळं एकत्र करून झाकण लावून एक शिट्टी झाली की gas बंद करायचा.
सगळी वाफ गेली की कुकर उघडून पुन्हा मध्यम gas वर ठेवायचा.
आता सगळं दुध आटेपर्यंत १० ते १२ मिनिटे सतत ढवळत राहायचं.
सगळं दुध आटून हलवा सुखा झाला की साखर घालायची.
साखर वितळली की खवा किसून घालायचा.
सगळा हलवा १० ते १५ परतून परतून शिजू द्यायचा.
हलवा सुखत आला की केशर अर्क, वेलची पूड आणि बारीक चिरलेल्या सुख्या मेव्याचे काप घालायचे.
एकदा सगळं ढवळून हलवा अगदी सुखा झाला की gas बंद करायचा.
तयारीसाठी लागणारा वेळ: २० मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: ४५ मिनटे
वाढणी: ६ जणांसाठी






Leave a Reply