आंब्याचा मौसम असला की प्रत्येक पदार्थात आंबा घालण्याचा मोह होतो. असाच एका सकाळी गोड शिरा बनवताना त्यात थोडा आमरस घातला आणि चव..काय वर्णावी!….मस्त..तुम्हीही करून बघा..आणि मला तुमचा अभिप्राय नक्की कळवा.
साध्या गोड शिऱ्याची कृती मी इथे दिली आहे. ह्या कृतीत अगदी कमी तूप वापरले आहे आणि पाणी घालून शिरा शिजवलेला आहे. जेव्हा आंबा घालून शीरा बनवण्याची वेळ येते तेव्हा तूप घालण्यासाठी हात आखडता घेऊ नये. पूर्ण शीरा दुधात शिजवल्यामुळे खूप मऊ आणि मोकळा बनतो.
हा शीरा बनवल्यावर २ ते ३ दिवस बाहेर चांगला राहतो अर्थात एवढे दिवस टिकला तर!…आता प्रत्येकवेळेला मी शीरा करताना आमरस घालते. आंब्याचा सिझन असेपर्यंत हा गोड पदार्थ enjoy करा.
खाली दिलेली कृती तंतोतंत केलीत तर मऊ मोकळा आणि बेताचा गोड शीरा बनेल. तूप व दुध घालण्यासाठी अजिबात कंजूसगिरी करू नका.
अंड किंवा condensed मिल्क न वापरता आंब्याचा केक कसा बनवायचा ते वाचण्यासाठी इथे click करा.
साहित्य
१ वाटी भाजलेला रवा
२ वाट्या दुध
१ वाटी साखर
अर्धी वाटी आमरस
अर्धी वाटी साजुक तूप
अर्धा चमचा केशर सिरप
पाव चमचा वेलची पूड
चिमुटभर मीठ
कृती
एका भांड्यात दुध घेऊन ते गरम होण्यासाठी मध्यम आचेवर ठेवावे.
कढईत तूप घेऊन त्यात भाजलेला रवा घ्यावा.
कढई मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवावी.
रवा थोडासा तुपात भाजत राहावा. पाच ते सहा मिनिटांनी उकळेले गरम दुध रव्यात ओतून ढवळून घ्यावे.
झाकण ठेऊन एक ते दिड मिनटे रवा दुधात शिजू द्यावा.
झाकण उघडून एकदा रवा नीट ढवळून घ्यावा.
आता त्यात आमरस, साखर, वेलची पूड, केशर सिरप आणि चिमुटभर मीठ टाकून सर्व चांगले एकजीव करावे.
साखर टाकल्यावर शीरा थोडासा पातळ होईल, झाकण ठेऊन २ ते ३ मिनटे शिजू द्यावा.
आता झाकण काढून, एकदा मस्त ढवळून गरमागरम खाण्यास द्यावा.
तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: १५ मिनटे
वाढणी: ४ जणांसाठी
पोषण मुल्ये
एकूण उष्मांक: 1080.2 Kcal
मेद: 13.06 ग्रॅम
प्रथिने: 20.3 ग्रॅम
कर्बोदके: 220.1 ग्रॅम






आमरस हा हिवाळ्यात भेटत नाही मग काय वापरायचे
Khup chan nkki try kren..
Khup chan nkki try kren..
A very nice and easy recipe. I kept aamras in summer. Now in Oct I prepared this dish with that aamras. A superb dish made by the above recope. Thanks…