
गौरी-गणपती असोत किंवा सत्यनारायण पूजा, प्रसादाच्या जेवणात अळू वडी किंवा कोथिंबीर वडी ही आवर्जून केली जाते. थंडीच्या दिवसात जेव्हा कोथिंबीर स्वस्त होते तेव्हा आमच्या घरी ह्या कोथिंबीर वड्या तुम्हांला कधीही तयार मिळतील. आमची आई, ह्या उकडून, तुकडे करून डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवते. जेव्हा पाहिजेत तेव्हा म्हणजे दुपारच्या जेवणात, चहासोबत किंवा कुणी पाहुणे आले की लगेचच तळून तय्यार.
तुम्हीं मला पहिल्यापासून follow करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की ३२ वर्ष माझ्या आईचा केटरिंगचा business होता. त्यामुळे ह्या वड्या खूप मोठ्या प्रमाणात आमच्याकडे बनवल्या जायच्या. तुम्हांला ह्याचं secret सांगायचं तर माझी आई ह्यात कधीच नुसतच डाळीचे पीठ घालून वड्या करत नाही. ती चण्याची डाळ ३ ते ४ तास भिजत ठेवते. आणि ही भिजलेली डाळ वाटून ती कोथिंबीर वडी बनवते.

असं केल्यामुळे ह्या वड्या छान खुसखुशीत बनतात. शिवाय आतून ह्यांना मस्त असे layers येतात. त्यामुळे आतून मऊ आणि वरून खरपूस क्रिस्पी आणि टेस्टी बनतात. मला स्वतःला डाळीच्या पीठामुळे पित्ताचा त्रास होतो म्हणून मी इथे मुगडाळ घेतली आहे. पण recipe लिहिताना मी पारंपारिक रीतीने कशा बनवायच्या ते दिले आहे.
तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा. तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा.
खाली दिलेल्या recipe ही तुम्ही बघू शकता.
साहित्य:
१ वाटी चणा डाळ
१ मोठी जुडी कोथिंबीर धुवून, सुकवून, बारीक चिरून
२ चमचे बेसन
२ मोठे चमचे तांदुळाचे पीठ
१ इंच आले
२ मिरच्या
१ मोठा चमचा गरम मसाला
१ मोठा चमचा लाल तिखट
१ छोटा चमचा हळद
चवीनुसार मीठ
२ मोठे चमचे चिंच गुळाची पेस्ट
तळण्यासाठी तेल
कृती:
चणा डाळ ४ ते ५ तासांसाठी भिजत ठेवायची.

कोथिंबीर धुवून कपड्यावर पसरून वाळवत ठेवायची.
चणा डाळ भिजल्यावर पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात घ्यायची.
त्यात आलं आणि मिरची टाकून जाडसर वाटून घ्यायची.

कोथिंबीर बारीक चीरून घ्यायची.
आता वाटलेली चणाडाळ, कोथिंबीर आणि बाकीचे जिन्नस एका परातीत घ्यायचे.

सगळ एकत्र करून सैलसर मिश्रण बनवायचे. घट्ट ठेवायचे नाही पण डोस्यासारखे पातळही करायचे नाही.

आता हे एका भांड्यात काढून level करून घ्यायचे. भांड्याला थोडा तेलाचा हात लावून घ्यायचा.

आता हे भांड मोदकपात्रात ठेऊन उकडायला ठेवायचे.

१५ ते २० मिनिटे, उकडल्यावर gas बंद करून मिश्रण थंड होऊ द्यायचं.
थंड झाल्यावर वड्या पाडून, डब्यात भरून ठेवायच्या.

आता हव्या असतील तेव्हा थोड्याशा तेलात तव्यावर fry करायच्या किंवा तळून घ्यायच्या.
तयारीसाठी लागणारा वेळ: ४ ते ५ तास
शिजण्यासाठी लागणारा वेळ: २५ मिनटे
वाढणी: ८ जणांसाठी






Leave a Reply