
काहीही गोड बातमी सांगायची असेल तर पेढे दिल्याशिवाय आपलं चालतच नाही. दिवाळी, गणपती, रक्षाबंधन अगदी परीक्षेच्या निकालानंतरही पेढे हे लागतातच. आपण जे बाहेरचे पेढे आणतो ते कित्येक वेळेला मैद्याचे बनलेले असतात. आज मी तुम्हाला घरच्याघरी २० मिनटात असे सुरेख चवदार माव्याचे पेढे कसे बनवायचे ते दाखवणार आहे.

यासाठी जर मावा घरी बनवायचा असेल तर अर्धा लिटर म्हशीचं दुध आटवून घेतले तर १०० ते ११० ग्राम मावा घरी बनेल. त्यासाठी २० मिनटे लागतील. जर मावा घरी बनवलेला असेल तर तो परत तुपावर परतायची गरज नाही. मी इथे मावा बाहेरून आणला असल्याने एकदा तुपावर परतून घेतला आहे.
तुम्हाला अशाच जर घरी बनवलेले गोड पदार्थ बघायचे असतील तर खालील लिंक ना जरूर भेट द्या.
मावा पेढे बनवताना बनवलेले मिश्रण जर मोदकांच्या साच्यातून काढले तर मावा मोदक तयार होतील. १०० ग्राम खव्यापासून ११ पेढे किंवा ११ मोदक बनतील.
साहित्य
१०० ग्राम मावा किंवा खोवा
१ छोटा चमचा साजूक तूप
३० ग्राम पिठी साखर
२ थेंब खाण्याचा केशरी रंग
१ छोटा चमचा केशर सिरप
अर्धा छोटा चमचा वेलची पूड
१ मोठा चमचा दुध पावडर (एच्छिक आहे, मी वापरलेली नाही)
कृती
एका nonstick pan मध्ये एक छोटा चमचा तूप गरम करा.
तूप गरम झाले की त्यात मावा टाका. मावा चांगला ५ मिनटे परता.
सतत ढवळत राहा नाहीतर मावा तांबूस रंगाचा होईल आणि त्याला करपटलेला वास येईल.
आता ह्यात केशर सिरप आणि केशरी रंग घाला.
आता हे मिश्रण ढवळताना एकत्र गोळा होऊ लागले की gas बंद करा.
थोडसं थंड होईपर्यंत परतत राहा. आता थोडं पसरून थंड होऊ द्या.
साखर गाळण्यावर चाळून घ्या.
मिश्रण थंड झाले की त्यात साखर आणि वेलची पूड टाका.
आता हे मळून घ्या. मळताना फार चिकट वाटलं तरच मिल्क पावडर टाका.
आता ह्या मळलेल्या गोळ्याचे ११ समान भाग करा.
आता मोदकाचा साचा असेल तर ह्या छोट्या गोळ्यांपासून मोदक बनवा.
साचा नसेल तर हातांनीच पेढ्यांचा आकार द्या.
पाहिजे असल्यास पिस्ते लावून सजवा.
तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: ७ मिनटे
वाढणी: ११ मावा मोदक






Leave a Reply