
माझ्या आजोळी आजही नारळी पोर्णिमा नारळी भाताशिवाय साजरी होत नाही. या शिवाय ओल्या नारळाच्या करंज्या आणि नारळाची वडी सुद्धा बनवली जाते. खर सांगायचं तर त्या दिवशी जरा गोडाचे overload होते. पण सगळ्या माहेरवाशीण आपापल्या तान्हुल्यांसह आलेल्या असतात कारण त्या दिवशी रक्षाबंधनसुद्धा साजरे करतात. मग करंज्या आणि नारळाच्या वड्या त्यांच्या सासरी देण्यासाठी खास तयार केल्या जातात.

आज मी तुम्हाला माझी नारळी भाताची recipe सांगणार आहे. आताच्या शहरी जीवनात माझ्या आजीच्या तऱ्हेने केलेला भात म्हणजे diabetesला निमंत्रण. ती १ वाटी तांदुळाला २ वाट्या गुळ असं प्रमाण घेऊन बनवते. शिवाय तिथला भातही थोडा चिकट होतो. मला असा भात आवडत नाही. मला वाटत तुम्हालाही खूप गोड आणि गोळा भात आवडत नसणार. मग माझ्या ह्या कृतीने करून बघा. तुम्हालाही हा नारळी भात परत परत खावासा वाटेल.
Click Here To Read This Narali Bhat Recipe in English.
साहित्य
१५० ग्रॅम (१ वाटी) बासमती तांदूळ स्वच्छ धुवून
१०० ग्रॅम (पाऊण वाटी) पिवळा गुळ चिरून
५० ग्रॅम (पाऊण वाटी) खोवलेला ओला नारळ
१ मोठा चमचा साजूक तूप
पाव छोटा चमचा मीठ
पाव वाटी सुखा मेवा ( काळ्या मनुका, तुकडा काजू, पिस्ता)
2 मोठे चमचे केशर खललेलं दुध
५ वेलची, १ दालचिनीचा तुकडा आणि ६-७ लवंगा
१ छोटा चमचा वेलची पूड
कृती
गरम दुधात केशर घालून बाजूला ठेवा.
बासमती तांदूळ धुवून २० मिनिटांसाठी भिजवून ठेवा.
दिड ते दोन लिटर पाणी उकळून, तांदूळ पाण्यातून काढून उकळत्या पाण्यात घाला.
भात बोटचेपा शिजला की हा भात चाळणीत काढून, गाळून, ताटात पसरवून थंड होण्यास ठेवा.
एका fry pan मध्ये तूप घालून मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवा.
तूप गरम झाले की त्यात अख्खा गरम मसाला घाला.
१-२ मिनिटांनी त्यात सुख्खां मेवा घालून परतून घ्या.
आता नारळ घालून २ मिनटे परतून, गुळ घाला.
गुळ पूर्ण वितळला आणि छोटे छोटे बुडबुडे दिसायला लागले की त्यात शिजवलेला भात आणि केशर घातलेलं दुध घाला.
हलक्या हाताने ढवळून ५ ते ७ मिनिटांसाठी झाकून शिजू द्या.
आता झाकण उघडून वेलची पूड घालून हलक्या हातांनी एकत्र करून परत २ ते ३ मिनिटे झाकून शिजू द्या.
आता gas बंद करून, कमीत कमी १५ मिनटे तरी झाकण उघडू नका.
१५ ते २० मिनिटांनी झाकण उघडून, थोडा ढवळून गरम गरम खायला घ्या.
तयारीसाठी लागणारा वेळ: २० मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: ३५ मिनटे
वाढणी: ४ जणांसाठी






Leave a Reply