पालक पराठा | पालकाची पोळी
हिरव्या पालेभाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करणे खूप आवश्यक आहे. खूप जणांना पालेभाज्या म्हटल्या की जेवणाची वासनाच राहात नाही. माझ्या घरीही हीच अवस्था आहे. पालेभाजी, पिठले आणि भाकरी असा बेत असला की आमच्याकडे पिठलं-भाकरी कशीतरी संपते आणि पालेभाजी फक्त मला संपवावी लागते.
बरेचवेळा मी पालेभाज्या पोळ्यांच्या पीठात मिसळून वेगवेगळे पराठे बनवते. पुदिना पराठा, कोथिंबीर पराठा, मेथी आणि पालक पराठा खूप चवीष्ठ लागतात. हिरव्या रंगामुळे हे पराठे सुंदर तर दिसतातच पण चवीलाही मस्त लागतात. पालक न आवडणाऱ्या लोकांनासुद्धा हे पराठे बघताक्षणीच खावेसे वाटतात. तिखट लोणचे आणि बुंदी किंवा आंबा रायत्यासोबत हे पराठे खायला छान लागतात.
पालकाच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते वाचण्यासाठी इथे click करा.
पालकाची पाने धुवून, पाण्यात उकळून पाने निथळून, मिक्सरमध्ये वाटून घ्यावीत. ही पालकाची पेस्ट फ्रीजमध्ये ४ ते ५ दिवस चांगली राहते. ही पेस्ट पालक पुरी, आलू पालक, पालक डोसा किंवा खाली दिल्याप्रमाणे पालक पराठे बनवताना वापरता येते.
To read this recipe in English please Click Here ‘Palak Paratha’.
साहित्य
३ मोठे चमचे तूप
१/२ छोटा चमचा तेल
कणिक भिजवण्यासाठी
दिड वाटी गव्ह्याचे पीठ
अर्धी वाटी पालकाची पेस्ट
१ छोटा चमचा (हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची )पेस्ट
१ छोटा चमचा मीठ
पाव छोटा चमचा गरम मसाला
अर्धा छोटा चमचा भाजलेल्या जीऱ्याची पूड
१ छोटा चमचा धने पूड
कृती
एका मोठ्या परातीत कणिक भिजवण्यासाठी वर दिलेले सर्व साहित्य घेणे.
थोडे-थोडे पाणी घालून पोळ्यांना मळतो तशी मऊसर कणिक मळून घ्यावी.
अर्धा चमचा तेल कणकेच्या गोळ्याला लाऊन अजून दोन मिनटे मळावे.
आता हा चांगला मळलेला कणकेचा गोळा कमीतकमी २५ मिनटे झाकून ठेवावा.
आता ह्या गोळ्याचे १० सारखे भाग करून घ्यावे.
आता एकेक करून ह्या पालकाच्या पोळ्या लाटून तूप लावून गरम तव्यावर खरपूस भाजाव्यात.
गरमागरम पराठे, रायत्यासोबत खायला द्यावे.
तुम्हांला जर अशाच अजून stuffed पराठ्यांच्या recipe बघायच्या असतील तर खालील video अवश्य पहा.
एकूण वेळ: ५० मिनिटे
वाढणी: ५ जणांसाठी
पोषण मुल्ये
एकूण उष्मांक: १५३९.८ Kcal
मेद: ५८.८०५ ग्रॅम
प्रथिने: ३८.९७ ग्रॅम
कर्बोदके: २१७.३७ ग्रॅम
फॉलिक आम्ल : ७५.९२ ug
To read this recipe in English please Click Here ‘Palak Paratha’.






I like this recipe