
तुम्ही जर मासे खाऊ असाल तर असं पापलेट तवा फ्राय बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल. मासे म्हणजे माझा वीक point आणि त्यातून फ्राय मासा आणि सोबत सोलकढी-भात म्हणजे मेजवानीच.
खर् सांगायचं तर बाहेर restarunt मध्ये जाऊन मला मासे खायला तितकस आवडत नाही. हजार शंका मनात येतात. त्यातून बाहेरचं खाऊन पोट बिघडत ते वेगळंच. त्यापेक्षा मासे किंवा इतर मांसाहार घरीच करून खाल्ला तर ते वेळ, पैसे तर वाचतातच पण त्यापेक्षाही ते खाऊन जे मानसिक समाधान मिळते त्यामुळे पोट भरून, मनही भरते.
कोणतीही मच्छी साफ करायला थोडा वेळ लागतो पण फ्राय करायला अगदी १० मिनिटे पुरतात. पापलेट कशी साफ करून मी मसाला लाऊन तवा फ्राय केली आहेत हे तुम्हाला खाली video मध्ये दाखवले आहे.
वाटप घाटप न करता अगदी सध्या पद्धतीने फ्राय करायची असतील तर लाल तिखट वापरले तरी चालेल पण मी हे लाल मिरच्यांचं तिखट वाटून ठेवते, मग बोंबील किंवा कोलंबी फ्राय करायची असेल किंवा अगदी सुरण किंवा कच्च केळेही फ्राय करताना हे कामाला येते.

साहित्य
३५० ग्राम ( २ मध्यम आकाराची) पापलेट स्वच्छ धुवून साफ करून
२.५ मोठे चमचे तेल
मुरवण्यासाठी:
अर्धा छोटा चमचा मीठ
पाव छोटा चमचा हळद
१ छोटा चमचा लाल तिखट / १ छोटा चमचा लाल मिरची आणि लसूण पेस्ट
१ छोटा चमचा मालवणी मसाला
१.५ मोठा चमचा तांदूळ पिठी
१ छोटा चमचा corn flour
१ मोठा चमचा कोकम आगळ
कृती
मासे साफ करून त्यावर हलक्या हाताने चीरा पाडून घ्याव्यात.
वर दिलेले मुरवण्यासाठीचे सर्व साहित्य एका पसरट डिश मध्ये घ्यावं.
सर्व एकत्र करून त्याची मस्त पेस्ट करून घ्यावी.
ही पेस्ट लावून मासे मुरवण्यासाठी किमान अर्धा तास तरी बाजूला ठेवावेत.
आता nonstick किंवा लोखंडी तवा मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवावा.
त्यात तेल घालून, तेल गरम झाल्यावर पेस्ट लावलेला मासा त्यात सोडवा.
एका बाजूने चांगला खरपूस तळल्यावर दुसऱ्या बाजूला पालटावे.
दोन्ही बाजूने छान लाल रंगावर खरपूस तळून गरम गरम सोलकढी भाता सोबत खायला घावे.
एकूण वेळ: ४५ मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी






Leave a Reply