फ्राय केलेली कोलंबी कुणाला आवडत नाही, नुसतं नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटते. कोलंबी म्हणजे आमच्या मांजरीचा(प्युनीचा) जीव की प्राण. तिला आणि मला तर रोज कोलंबी फ्राय खायला आवडेल पण आरोग्याच्या दुष्टीने पाहता रोज तेलात तळलेली कोलंबी खाणे योग्य ठरणार नाही. हो..हो रोज म्हणजे अगदी रोज नाही, पण आठवड्यातून दोनदा खायची असेल तर मी एक दिवस फ्राय करते आणि एक दिवस असं मस्त सुखं कालवण करते.
कुठलीही मच्छी किंवा चमचामित उसळ करायची असेल तर आदल्या दिवशी कांद्याखोब्य्राचे वाटण करून फ्रीजमध्ये ठेवले तर दुसय्रा दिवशी पदार्थ करताना खूप वेळ वाचतो. मी नेहमी असे वाटण जरा जास्त प्रमाणात करून ठेवते त्यामुळे संपूर्ण आठवडा अनेक चमचमीत पदार्थ पटकन करता येतात.
मटन किंवा चिकन करताना हे वाटण सुक्या खोबऱ्याचे बनवतात, पण कोलंबी मसाल्यासाठी वाटण करताना मी ओला ताज्या नारळाचा चव (खवलेलं ओले खोबरे) वापरला आहे.
साहित्य
२०० ग्रॅम (१ कप) साफ केलेली कोलंबी
१ मध्यम आकाराचा कांदा जाडसर चिरून
२ मोठे चमचे तेल
½छोटा चमचा मीठ
सुखे मसाले
½छोटा चमचा हळद
¾छोटा चमचा लाल तिखट
१ छोटा चमचा मालवणी मसाला
वाटणासाठी
१ मोठा कांदा पातळ काप करून
¼ कप ओल्या नारळाचा चव
४-५ सुख्या लाल मिरच्या
१०-१२ लसूण पाकळ्या
छोटासा आल्याचा तुकडा
कृती
प्रथम कढईत १ चमचा तेल घेऊन मध्यम आचेवर तापत ठेवावे.
तेल गरम झाले की त्यात वाटणासाठी चिरलेला कांदा टाकावा.
कांदा चांगला खरपूस रंगाचा होईपर्यंत ५ ते ७ मिनिटे परतावा.
त्यात सुख्या लाल मिरच्या, लसूण व आलं टाकून २ मिनिटे भाजावे.
सर्वात शेवटी खवलेला ओला नारळ टाकावा.
नारळ मातकट रंगाचा झाला की मिश्रण गॅसवरून उतरून थंड होऊ द्यावे.
थंड झाल्यावर हे मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.
कढईत परत १ चमचा तेल घेऊन मध्यम आचेवर तापत ठेवावे.
तेल तापले की त्यात जाडसर चिरलेला कांदा टाकावा.
कांदा गुलाबीसर झाला की त्यात वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतावे.
कडेने तेल सुटल्याचे दिसू लागताच वर नमूद केलेले सुखे मसाले घालावे.
थोडेसे पाणी शिंपडून १ वाफ येऊ द्यावी.
आता ह्यात कोलंबी आणि मीठ टाकावं. १ ते २ मिनिटे बारीक गॅस करून शिजू द्यावं.
गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भाता बरोबर वाढावं.
एकूण वेळ: ३५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी






Baghunach tondala pani sutla..super tempting.. We too make it similarly.. Yummy
Me hya padhatine kolambi banavali Mazhy
Mr. Na khup avadali.
Thank you for trying this recipe!
जबरदस्त
मी हि रेसिपी बघुन बनवली पण
सर्वांना खुप आवडली
प्रतिकिया दिल्याबद्दल धन्यवाद!
recepi bhari tondala pani sutale
ME PUN HE RECIPI BANAWALI WOW KYA SANG KYA MAST ZALI
आपला अभिप्राय कळवल्याबद्दल आभारी आहे. 🙂
Wow. Sarvanna aavdali. Thanks a lot to share this recipe
आपला अभिप्राय कळवल्याबद्दल धन्यवाद!