ही चिकन करी बघून तोंडाला पाणी सुटले की नाही? ही चमचमीत, झणझणीत चिकन करी बनवायला एकदम सोपी आणि झटपट तयार होणारी आहे. एकदा का कांदा-खोबर्याचे वाटण तयार करून घेतले की ही डिश १५-२० मिनटात खायला तयार झालीच म्हणून समजा.
कांदा-खोबर्याचे वाटण करणे ही एकच वेळखाऊ गोष्ट ह्याच्यात त्रासदायक वाटू शकते. मी हे वाटण सुटीच्या दिवशी बनवून फ्रीजमध्ये ठेवते. जेव्हा चिकन बनवायचे असेल तेव्हा हे तयार वाटण फोडणीला टाकले, की चिकन शिजण्यापुर्त थोडा धीर धरायचा. गरमागरम करी २० मिनटात तयार होते.
खाली दिलेल्या कृतीत मी ही डिश कढईत कशी बनवावी हे सांगीतले आहे, पण जर तुम्ही घाईत असाल तर कुकर मध्येही २-३ शिट्टया घेतल्यात तरी चालतील. मला जास्त वेळ नसेल किवां सकाळी घाईच्या वेळी ही ग्रेव्ही करायची असेल तेव्हाच मी कुकरमध्ये शिजवते. कुकरमध्ये एकदा झाकण लावल्यावर शिट्या होईपर्यंत चिकन किती शिजले आहे याचा लगेच अंदाज येत नाही त्यामुळे कधी-कधी चिकन जास्त शिजण्याची भीती असते.
ही चमचमीत चिकन करी ज्वारी किवां तांदूळाच्या भाकरी सोबत मस्तच लागते. भाकरी नसेल तर गरमागरम फुलका, वाफाळता भात सोबत तुपाची धार घेऊनही खायला मजा येते. जरूर करून बघा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा. वेगवेगळ्या chicken recipe करून बघायच्या असतील तर खाली लिंकवर click करा.
To read this recipe in English please Click Here.
साहित्य
४०० ग्रॅम चिकनचे तुकडे
१ वाटी भाजलेल्या कांद्याखोब्र्याचे वाटण
१ मोठा चमचा सुखा मालवणी मसाला
१ छोटा चमचा काश्मिरी लाल तिखट
१ छोटा चमचा मीठ
१ मोठा चमचा तेल
अर्धी वाटी पाणी
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती
कढईत तेल टाकून, ती मध्यम आचेवर गरम होण्यास ठेवावी.
तेल गरम झाल्यावर त्यात भाजलेला कांदा खोबरे मसाला टाकावा.
मसाला चांगला तेल सुटेपर्यंत ४ ते ५ मिनटे परतावा.
आता ह्यात चिकनचे तुकडे टाकून, आच मंद करावी.
मंद आचेवर, कढईवर झाकण ठेऊन तुकडे ४-५ मिनटे शिजवून घ्यावेत.
नंतर मीठ, मालवणी मसाला आणि लाल तिखट टाकावे.
अर्धी वाटी पाणी टाकून, रस्सा नीट ढवळून झाकण ठेवावे.
मंद आचेवर ८ ते १० मिनटे शिजू द्यावा.
आता झाकण उघडल्यावर छान तरी दिसेल.
चिकन शिजल्याची खात्री करून रस्सा आचेवरून उतरवावा.
बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गरमागरम वाढावा.
तयारीसाठी लागणारा वेळ: ८ मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: २२ मिनटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी
पोषण मुल्ये
एकूण उष्मांक: ७५३.४० Kcal
मेद: ३३.२५ ग्रॅम
प्रथिने: ९७.०८ ग्रॅम
कर्बोदके: २८.४७ ग्रॅम
तंतूमय पदार्थ: ६.४० ग्रॅम
To read this recipe in English please Click Here.
मला सामावुन घेण्यासाठी आभारी आहे
I love this recipe. One of my favorites. Thank you for sharing this.
Simon
ऊत्क्रुष्ठ सोप्पी व चवदार क्रृ
Nice recipe
Very nice😄
very nice recipe, thanks for sharing