
नेहमीच नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येकापुढे होताच आता lockdown आणि Covid मुळे नाश्त्याला हेल्दी आणि झटपट काय बनवायचं हा नवीन आणि जटील प्रश्न निर्माण झालाय.
आमच्या घरी ब्रेड हा खूपच क्वचित आणला जायचा. पण घरी बसून तीन ते चार वेळा किचनमध्ये cooking करणे, तेव्हडीच जास्त भांडी घासणे आणि परत थकून दुसऱ्यादिवशीची भाजी कापणे, स्वयंपाकाची तयारी करणे असा थकवणारा दिनक्रम होऊ लागल्यानंतर, ब्रेड आणि ब्रेडच्या वेगवेगळ्या recipes ह्यावर experiment होऊन brunch साठी असे पोटभरीचे, healthy आणि झटपट होणारे पदार्थ जन्माला आले.
कॉर्नचे दाणे, पालक आणि चीज ह्यांचे भन्नाट combination ह्या sandwich मध्ये तुम्हांला चाखायला मिळेल. विशेष म्हणजे ह्या recipe साठी चटणी बनवायची गरज नाही.
To Read This Recipe in English : Corn Cheese Spinach Sandwich
lockdown मध्ये ज्या गोष्टी सोप्प्या पद्धतीने उपलब्ध होतील त्याच वापरल्या आहेत. लसूण पावडर, mozzarella cheese अशा गोष्टी नसतील तर साधे cube cheese आणि लसूण पाकळ्या वापरल्या तरी चवीत फारसा फरक जाणवणार नाही.
ह्या sandwich साठी मी पालकाची पाने धुवून, सुकवून, बारीक चिरून घेतली आहेत. तुम्हीही अशीच सुकवून घ्या. पालकाची पाने फोडणीला घातल्यावर त्यांना खूप पाणी सुटते त्यामुळं आधीच पाने ओली असतील तर फिलिंग किंवा आपला भरण्याचा मसाला खूपच पातळ होईल आणि पाणी आटेपर्यंत शिजवलं तर पालक काळा पडेल. gas वर आपल्याला अगदी ५ ते ७ मिनिटांत हे filling तयार करायचंय.

साहित्य
अर्धा वाटी (१०० gm) मक्याचे दाणे
१ छोटी जुडी पालक धुवून, सुकवून बारीक चिरून
२० grams (1 small cube) चीज किसून
४ ब्रेड slices
१ मोठा चमचा बटर
२ मोठे चमचे टोमटो sauce आणि मेयोनीज एकत्र करून
सुखे मसाले
चवीनुसार मीठ
चिमुटभर काळी मिरी पावडर
पाव चमचा पिझ्झा seasoning
चिमुटभर साखर
चिमुटभर चिली flakes
२ लसूण पाकळ्या पेस्ट करून किंवा (पाव चमचा लसूण पावडर)

कृती
एक नॉनस्टिक कढई मध्यम आचेवर गरम करायची.
त्यात एक छोटा चमचा बटर टाकायचं. लगेचच मक्याचे दाणे घालायचे.
दाणे एक मिनिटभर परतल्यावर त्यात बारीक चिरलेला पालक घालायचा.
पालक घातल्यावर २ ते ३ मिनिटे परतायचा, तो शिजून मिश्रण कोरडं होतं आलं की त्यात वर दिलेले सर्व सुखे मसाले घालायचे.
एक मिनिटभर परतून gas बंद करायचा. १० मिनिटं हे मिश्रण थंड होऊ द्यायचं.
१० मिनिटांनी त्यात चीज टाकायचं, परत एकदा ढवळून सगळं filling एकजीव करायचं.
सगळ्या पावांच्या तुकड्यांवर टोमटो sauce आणि मेयोनीज एकत्र करून पसरून घ्यायचं.
आता corn आणि पालक मिश्रण त्यावर पसरून घ्यायचं.
आता हे sandwich तुम्ही toaster मध्ये toast करू शकता किंवा मग दोन्ही बाजूने वरून बटर लावून लोखंडी तव्यावर भाजून घेऊ शकता.
हव्या त्या आकारात कापून गरम गरम sauce सोबत खायला घ्या.
तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ: १० मिनटे
वाढणी: २ जणांसाठी

Leave a Reply